PM SHRI उपक्रम ( 6 स्तंभ)
1) अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन:-
“पीएम श्री” शाळांमधील अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनांचा उद्देश विद्यार्थ्यांना संस्र्था आणि उद्देशाची भावना यासह स्मरणशक्तीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःचे जीवन घडविण्यासह इतरांच्या जीवनात योगदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांनी सुसज्ज करणे हा आहे. सदर शाळांमध्ये शिकवणे आणि शिकणे अधिक परस्परसंवादीपणे होईल आणि वर्गातील सत्रे अधिक मनोरंजक, सर्जनशील, सहयोगी आणि अन्वेषणात्मक असतील याची खात्री करण्यात येईल.
2) प्रवेश आणि पायाभूत सुविधा:-
“पीएम श्री” शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी, जास्तीत जास्त ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक शिकण्याचे वातावरण प्रदान करतील. सर्व लिंगांच्या तसेच दिव्यांग मुलांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक शैक्षणिक वातावरण प्रदान होईल व ते शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आरामदायक आणि प्रेरित असल्याची खात्री करतील.
याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या शाळांचा विस्तार करण्यात येईल तर अशा शाळा अस्तित्वात नसलेल्या भागात अतिरिक्त दर्जेदार शाळा बांधून विशेषत: मुलींसाठी सुरक्षित आणि व्यावहारिक वाहतूक व्यवस्र्थेसह, वसतिगृह जेणेकरुन सर्व मुलांना अशा योग्य स्तराच्या दर्जेदार शाळांमध्ये जाण्याची संधी मिळेल.
3) मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व:-
शिक्षणातील झपाट्याने होत असलेली प्रगती पाहता, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र तसेच मुल्यमापन इत्यादींच्या नवीनतम पद्धतीनुसार शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. शिक्षक हे शैक्षणिक परिसंस्र्थेतील महत्त्वाचे सहाय्यक देखील आहेत. शिक्षण व्यवस्थेतील गतिमानतेसाठी शिक्षकांनी आजीवन शिकत राहून प्रशिक्षण आणि उच्च कौशल्याच्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व विकास हा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
“पीएम श्री” शाळा शिक्षकांना त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षरीत्या तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या बाबतीत आवश्यक समर्थन प्रदान करण्यासाठी सक्षम करतील.
4) समावेशक पद्धती आणि लिंग समानता:-
शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणाचा विद्यार्थ्याच्या भावनिक कार्यक्षेत्रावर प्रभाव टाकणा-या प्रेरणा, दृष्ट्टीकोन आणि धारणा इ. मूल्यावर परिणाम होत असल्याने, असे वातावरण असलेल्या “पीएम श्री” शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यानूसार “पीएम श्री” शाळा सर्वसमावेशक पद्धती आणि लिंग समानतेमध्ये उत्कृ ष्ट्टता प्राप्त करण्याचे सुनिश्चित करतील.
5) व्यवस्र्थापन, देखरेख आणि प्रशासन:-
“पीएम श्री” शाळांनी शालेय परिवर्तनाचा परिणाम तपासण्यासाठी एक मजबूत व्यवस्र्थापन, देखरेख आणि प्रशासन प्रणाली सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यामध्ये “पीएम श्री” शाळांमध्ये विद्यमान योजना, नियोजन यंत्रणा, संसाधन व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापकीय पैलूंसह निरीक्षण आणि मूल्यमापन यंत्रणा यांचा समावेश आहे. त्यानूसार “पीएम श्री” शाळा पुरेशी व संबंधित व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करतील.
6) लाभार्थी समाधान:-
शिक्षण प्रणालीमध्ये असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समुदाय इ. विविध भागधारकांच्या भूमिका आणि परिणामकारकता विचारात घेऊन “पीएम श्री” शाळांमधील गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येईल. वरील नमूद भागधारकांनी हाती घेतलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे एकत्रीकरण शाळेच्या परिवर्तणनात महत्त्वाची भूमिका बजावेल.